अंबादास जाधव यांची कर्जत तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सदस्य पदी निवड .

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी. राशीन येथील सुसंस्कृत कुटुंबातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व समाजकार्यासाठी नेहमी अग्रेसर म्हणून तालुक्यात ओळख असलेले अंबादास भगवान जाधव यांची कर्जत तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका कार्यकारणी मध्ये सदस्य पदी निवड प्राध्यापक गोरे सर, श्री तरटे, प्रा. अनारसे सर, प्रा . बोडखे सर, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड कर्जत येथे करण्यात आली.
या मिळालेल्या पदाचा उपयोग अंबादास जाधव यांच्यामते समाजोपयोगी कार्यासाठी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास भर देणार असून राशीन व इतर विविध भागातील शासकीय सेवेतील विविध अडचणी जसे की तहसील संदर्भात असलेल्या सेवा, पुरवठा विभागातील सेवा, गॅस संदर्भात येणाऱ्या तक्रारी संदर्भात ग्राहकांचे निवारण करणे, पुरवठा विभागात वेगवेगळ्या रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या फसवणुकीबाबत व इतर शासकीय समस्येबाबत ज्याच्याशी ग्राहकांचा संबंध येतो अशा अनेक शासकीय समस्यांचे निवारण करण्याचे काम संबंधित कार्यकारणी काम करत आहे. श्री अंबादास जाधव यांना मिळालेल्या समाज उपयोगी सदस्य पदामुळे राशीन व पंचक्रोशीतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.