राशिन मध्ये महामानवास जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विनम्र अभिवादन.

राशीन (प्रतिनिधी);- जावेद काझी.महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राशीन येथील मुख्य बाजारपेठेत महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी मा. पंचायत समिती सदस्य/तथा माजी उपसरपंच शंकर देशमुख, मा. उपसरपंच शाहू राजे राजे भोसले, युवक नेते राजेंद्र देशमुख, शहाजीराजे राजेभोसले, शिंदे वकील, युवक नेते भीमराव साळवे, आर पी आय चे नेते रवींद्र दामोदरे , शिवसेनेचे सुभाष जाधव,भाजपा चे एकनाथ धोंडे, तात्यासाहेब माने, शोएब काका काझी,पांडुरंग भंडारे, डॉक्टर विलास राऊत,मधुकर दंडे पाटील, राशीन दूरक्षेत्रचे पोलीस
उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, राष्ट्रवादीचे दादासाहेब परदेशी,माऊली सायकर, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, विकी साळवे सर, कमलेश साळवे, सचिन साळवे,इतर पदाधिकारी ग्रामस्थ भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच राशीन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, निळा झेंडा चौक, भीम नगर, इंदिरानगर व इतर ठिकाणी महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.