जिल्हाधिकारी यांच्या दालनात कर्मचारी यांच्या समवेत मिटिंग करून मार्ग काढण्याचे लेखी पञावर आंदोलन तात्पुरते स्थगित – भास्कर भैलुमे नगरसेवक

(समृद्ध कर्जत प्रतिनिधी) कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळा पासुन स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी नामे 1) लिलाबाई भाऊ कांबळे 2) कमल शिवाजी भिसे 3) विमल सुधाकर आखाडे 4) भामाबाई लश्र्मण भैलुमे व यांंच्या आधिच्या तीन महिला स्वच्छता कर्मचारी नामे 1)पार्वती ईश्वर कदम 2) सुशिला मारूती ओव्हळ 3) विमल मुरलीधर लोढे या सर्व महिला स्वच्छता कर्मचारी या
सदर ग्रामपंचायत कालीन कर्मचारी यांनी आयुष्यभर तुटूपुंजा वेतनावर सफाई कर्मचारी म्हणून काम केले.या सर्व कर्मचारी यांच्या समवेत आज कर्जत नगरपंचायत कार्यालया समोर नगरसेवक भास्कर भैलुमे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल मुजोबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष रविंद्र सुपेकर यांचे आंदोलन चालु असताना कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सचिन घुले व सुनिल शेलार याच्या मध्यस्थी ने कर्जत नगरपंचायत चे मुख्याधिकारी जायभाय यांच्या लेखी पञानुसार
शासकिय परिपत्रका प्रमाणे तात्काळ कारवाई करून कर्जत नगरपंचायत मधिल स्वच्छता कर्मचारी यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात मिटींग करून कर्मचारी यांच्या विषयांवर तात्काळ कारवाई करण्याचे लेखी अश्वासन आंदोलनकर्तेे यांना दिल्या नंतर
आजचे जाहिर धरणे आंदोलन नगरसेवक भास्कर भैलुमे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल मुजोबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष रविंद्र सुपेकर यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरत आम्ही कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत हे ठणकावून सांगीतले .तेव्हा सदर नगरपंचायत कर्जतने जे लेखी पञ आम्हाला दिले आहे त्यानुसार जर शासकिय परिपत्रका प्रमाणे स्वच्छता कर्मचारी यांच्या वारसाना तात्काळ सामावून घेण्याची कार्यवाही नाही झाली तर कर्जत नगरपंचायत बेमुदत टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी दिला.
फक्त आंदोलन स्थगित करण्यापुरते जर हे पञ दिले व नंतर यावर आपल्या कार्यालयाकडुन कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही तर सर्व कर्मचारी वर्गाला घेऊन त्याच्या न्याय हक्का साठी पुन्हा कर्जत नगरपंचायत कार्यालयात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आजचे जाहिर धरणे आंदोलन स्थगित करताना नगरसेवक भास्कर भैलुमे यानी आंदोलन स्थगित करते वेळेस दिला.
यावेळी गट नेते संतोष म्हैञे उपगटनेते सतिष पाटील नगरसेवक सुनिल शेलार रिपाईचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कदम आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आखाडे विजय साळवे किशोर कांबळे सुमित भैलुमे आदी सर कर्जत नगरपंचायतीच्या सर्व महिला स्वच्छता कर्मचारी व पुरूष याच्या उपस्थित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.