कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीचे ठिय्या आंदोलन मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी पत्रावर तात्पुरते स्थगित – भाऊसाहेब तोरडमल

(समृद्ध कर्जत प्रतिनिधी) : – पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी कर्जत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी काल (दि.२) रोजी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.
ऐन उन्हाळ्यात कर्जत शहर व उपनगरांतील नागरिकांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कर्जत नगरपंचायतीचे पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी तीन महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत आगामी काळात कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याबाबत लेखी कळवले होते,
सर्वसाधारण सभा तसेच मासिक बैठकीत हा विषय घेतला होता. मात्र, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी केलेल्या सुचनांकडे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी दुर्लक्ष केले, यामुळे कर्जत्करांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही, म्हणून भाऊसाहेब तोरडमल यांनी कर्जत नगरपंचायतीच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू केले होते.
आंदोलन रात्री उशिरापर्यंत चालले त्यानंतर मुख्याधिकारी यांनी आपल्या मागण्यानुसार स्टॅंडवर इलेक्ट्रिकल मोटर बसवणे, जलशुद्धीकरण केंद्रावर तुरटी व टीसीएल पावडर तसेच देखभाल साहित्य बाबत , शहरातील सर्व लिकेज काढणे त्याचबरोबर असणारी सर्व कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे त्याचबरोबर पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, अग्निशामक कर्मचारी यांची सर्व पगार एक महिन्यात देण्याच्या लेखी पत्रानंतर ठिय्या आंदोलन मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे इंजि. अजिनाथ गीते तसेच कर्जत नगरपंचायतचे गटनेते संतोष म्हेत्रे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, राष्ट्रवादीचे नेते सुनील शेलार,
नगरसेवक भास्कर भैलुमे ,रवींद्र सुपेकर यांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.यावेळी उपगटनेते सतिष पाटील रिपाईचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कदम आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आखाडे विजय साळवे किशोर कांबळे सुमित भैलुमे कर्जत नगरपंचायतीच्या पुरूष कर्मचारी याच्या उपस्थित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.