ब्रेकिंग
हौसराव साळुंके यांचे निधन : ३० वर्षे पोस्टमास्तर म्हणून सेवा

Samrudhakarjat
4
0
1
0
7
0
आळसुंदे : येथील ज्येष्ठ नागरिक हौसराव यशवंतराव साळुंके (वय ९०) यांचे सोमवार, ३१ मार्च २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांनी आळसुंदे येथे पोस्ट मास्तर म्हणून तब्बल ३० वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हौसराव ( दादा) साळुंके हे अत्यंत शांत, मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष व निष्कलंक सेवा अधिकारी म्हणून ओळखले जात. सेवानिवृत्तीनंतर ते आळसुंदे येथे वास्तव्यास होते. त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम बुधवार, ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी 8.00 वाजता सिद्धटेक येथे पार पडणार आहे.
त्यांच्या पश्चात परिवार, नातेवाईक व मित्रमंडळी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावातील एका अनुभवी व संयमी व्यक्तीमत्त्वास मुकल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.