” विठ्ठल रुक्मिणी” मंदिराच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन, समाजजागृतीचा संदेश व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात साजरा”

कर्जत प्रतिनिधी : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिक्षक कॉलनी प्रभाग क्रमांक ८ या ठिकाणी सालाबादप्रमाणे २५ डिसेंबर रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर १३व्या वर्धापन दिननिमित्त कीर्तनकार ह .भ. प. विकास महाराज देवडे तसेच कीर्तन साथ ह भ प संदीपान महाराज तनपुरे संस्थापक अध्यक्ष श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्था किर्तन साथ संच रेहकुरी त्याचबरोबर हभप विकास महाराज देवडे यांनी कीर्तनाची सुरुवात सार्थकी जीवनाची प्रतिपादित या अभंगांनी केली.
याचा अर्थ मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली पण बसलेल्या मध्ये जीवन नावाची संधी प्रत्येकाला कळाली असे नाही. ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचे सोने करून मिळालेला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक दृष्टांत देत समाज जागृती चा संदेश आपल्या सुश्राव्य वाणीतून दिला .तसेच वासुदेव, पिंगळा, समर्थ गर्जना त्याचबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका विषयावर उदाहरण देत कीर्तन व त्या नंतर महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मा. जि.प सदस्य प्रवीण घुले.पा,नगरसेविका छायाताई शेलार,नगरसेवक भास्कर भैलुमे,रवींद्र सुपेकर,शहराध्यक्षा प्रीती जेवरे तसेच प्रभाग क्रं. ८ मधील शेकडोंच्या संख्येने सर्व माताभगिनी पुरुष बांधव यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय वारकरी सेवा प्रतिष्ठान व श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान चे सदस्य व पदाधिकारी आणि सर्व लहान थोर मंडळींनीआयोजन केले.