
कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप स्टाफ सह कर्जत हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने कर्जत शहरातील म्हसोबा गेट जवळ वसीम चांदखान पठाण हा त्याच्या राहत्या घरात बेकायदेशीर अवैधरीत्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांना याबाबत माहिती देऊन स्टाफ सह सदर ठिकाणी छापा टाकला असता एक व्यक्ती राहत्या घरातून देशी विदेशी दारूची विक्री करताना आढळून आल्यामुळे त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वसीम चांदखान पठाण वय 37 वर्ष राहणार म्हसोबा गेट कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून देसी बॉबी दारू संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 384 सीलबंद बाटल्या मिळाल्या या प्रत्येक बाटलीची किंमत 70 रुपये दराने असा एकूण 26,880/- रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली कर्जतचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, सहाय्यक फौजदार सलीम शेख, पोलीस नाईक प्रवीण अंधारे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, शाहूराज तिकटे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे आणि महिला पोलीस कर्मचारी राणी व्यवहारे यांनी केली आहे.