मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत 19.13 कोटींच्या 11 रस्ते कामांना मंजुरी – आमदार प्रा.राम शिंदे

कर्जत (प्रतिनिधी) :- आमदार प्रा.राम शिंदे यांनी पाठपुरावा केलेल्या 11 रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 मधून 19.13 कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून 20.400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता देणारा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेसाठी पुन्हा एकदा मोठे गिफ्ट दिले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात,यासाठी आमदार प्रा.राम शिंदे नेहमी प्रयत्नशील असतात. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी मतदारसंघात गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता ही मोहिम राबवली होती. यासाठी त्यांनी करोडो रूपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला होता. विधानपरिषद सदस्य झाल्यापासून आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी भरीव निधी खेचून आणण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी करोडो रूपयांचा निधी मंजुर करुन आणण्यात यश मिळवले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास कामांचा नवा झंझावात त्यांनी हाती घेतला आहे. यामुळे जनतेत समाधानाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांची कामे मंजुर व्हावीत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. त्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी 19 कोटी 13 लाख 59 हजार इतका भरीव निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून 20.400 किलोमीटर रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. या कामांची पाच वर्षे देखभाल दुरूस्ती करणे बंधनकारक असणार आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना सरकारकडून भरीव निधी मंजुर झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील मंजुर झालेले रस्त्यांची कामे खालील प्रमाणे
१) जातेगाव ते केदारेश्वर मंदिर रस्ता – १.८०० किलोमीटर, मंजुर निधी – १ कोटी ४४ लाख ८४ हजार.
२) सारोळा ते काटेवाडी रस्ता – १.४५० किलोमीटर, मंजुर निधी – १ कोटी १७ लाख ६१ हजार
३) धामणगाव ते जिल्हा हद्द रस्ता – २.७०० किलोमीटर, मंजुर निधी – २ कोटी ७ लाख ५२ हजार
४) पिंपळगाव उंडा ते जगताप वस्ती रस्ता – १.३५० किलोमीटर, मंजुर निधी – १ कोटी ३८ लाख ३९ हजार
५) आपटी ते गव्हाणवस्ती रस्ता – १ किलोमीटर, मंजुर निधी ९२ लाख १० हजार
६) अरणगाव ते निगुडेवस्ती – १.४०० किलोमीटर, मंजुर निधी – १ कोटी ३० लाख १० हजार रूपये.
७) रावळगाव ते चिंतामणी मंदिर – १.२०० किलोमीटर, मंजुर निधी – १ कोटी १६ लाख ६३ हजार.
८) खांडवी ते टरमाळवाडी रस्ता – १.४०० किलोमीटर, मंजुर निधी – १ कोटी ६२ हजार
९) राशीन ते जिराफवस्ती रस्ता – २.८०० किलोमीटर, मंजुर निधी – २ कोटी ४० लाख १८ हजार
१०) निंबे ते डोमाळवाडी रस्ता – ४ किलोमीटर, मंजुर निधी – ४ कोटी १२ लाख ९१ हजार
११) सिध्देश्वर मंदिर बोरमळा ते जुना वाळूंज रस्ता – १.३०० किलोमीटर, मंजुर निधी – २ कोटी १२ लाख ६९ हजार
– आमदार प्रा.राम शिंदे”