ब्रेकिंग
राशिन मध्ये मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Samrudhakarjat
4
0
1
9
3
5
राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राजे बागसवार दर्गाह राशीन येथे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद ए मिलादुन्नबी जुलूस)ढोल ताशा च्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी, दरूदखानी,फातिहा, सलाम, पडत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस साजरा केला. यानंतर राजे बाग सवार दर्ग्यावर फातिया देत चादर फुल चढवण्यात आली. यानंतर हिंदू मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी खिरपुरी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी भाजपा राज्य सरचिटणीस अल्लाउद्दिन काझी,मा . सभापती श्याम कानगुडे, राशीन गावचे उपसरपंच शंकर देशमुख, शहाजी राजे भोसले, दर्ग्याचे मुजावर ताजुद्दीन काझी , फिरोज तांबोळी, संतोष गवळी, बंटी गवळी, सलीम शेख, विकास साळवे, राजू तांबोळी, सोहेल पठाण, लतीफ पठाण, अली पठाण, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.