राशीन च्या अचानक मित्र मंडळाने पहिल्याच वर्षी काढली गणरायाची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे महात्मा ज्योतिबा फुले चौकात अचानक मित्र मंडळाची स्थापना याच वर्षी करण्यात आली.
हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवून सर्व जाती धर्मातील लोकांनाही एकत्रित आणण्याचा प्रयत्न या अचानक गणपती मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.मंडळाच्या पहिल्याच वर्षी महाप्रसादाची उत्कृष्ट नियोजन गणेश भक्तांकडून करण्यात आले. पुढील वर्षी सामाजिक धार्मिक व इतर बहुउद्देशीय कार्यक्रम करण्याची मंडळाची संकल्पना आहे. तसेच आज गणरायाची मिरवणूक वाजत गाजत बँड ढोल ताशाच्या गजरात फटाकड्याचे आतिश बाजी करत मोठ्या उत्साहात अचानक मित्र मंडळाच्या वतीने असंख्य गणेश भक्तांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मंडळाचे संस्थापक भारत साळवे, अध्यक्ष ईश्वर सोनवणे, उपाध्यक्ष बापू ताकमॊगे, खजिनदार दत्ता आढाव, सचिव अजीम काझी, सदस्य जीवन कांबळे, नितीन भिताडे , सोहेल बागवान, शहाबाज काझी, विकी संचेती, प्रदीप दळवी, श्रीकांत कानगुडे, किरण सायकर, सतीश झगडे, दीपक शेटे, आशु तांबोळी, लाहोर महाराज, रावा सायकर, अनिल गवळी, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणूकीत उपस्थित होते.