कर्जतमध्ये आधुनिक सुविधांसह ‘हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह’ चे उद्या भव्य उद्घाटन

(समृद्ध कर्जत वृत्तसेवा) – कर्जत शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या “हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह” चा भव्य शुभारंभ सोहळा उद्या, रविवार दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी 6 वास्ता संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम कर्जत येथील राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर आयोजित करण्यात आला असून, या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह” हे कर्जत शहरातील हॉटेलिंग क्षेत्रात एक नवे पर्व ठरणार आहे. येथे ग्राहकांसाठी विविध उच्च दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी लक्झरी रूम, एसी कॉन्फरन्स हॉल, लग्न समारंभासाठी प्रशस्त हॉल, एसी व नॉन-एसी लॉजिंग यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
या नव्या हॉटेलच्या स्थापनेमुळे कर्जतमध्ये आधुनिक आणि आरामदायक हॉटेलिंगचा अनुभव स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना घेता येणार आहे. उच्च दर्जाची सेवा आणि आकर्षक सोयी-सुविधांमुळे हे हॉटेल व्यवसाय, कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
भोसले आणि धुमाळ परिवारातर्फे या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.