महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीला पारंपारिक गंगाजल महा अभिषेक प्रा. राम शिंदे च्या हस्ते संपन्न

कर्जत (प्रतिनिधी):-श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गंगाजलने महाअभिषेक करण्याची परंपरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चॅरिटेबल ट्रस्ट इंदोर यांच्या वतीने गेली 253 वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. यावर्षी ट्रस्टच्या वतीने गंगा नदीचे पाणी श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील वंशज आमदार प्रा. राम शिंदे, सौ आशाताई शिंदे, मातोश्री, चिरंजीव अजिंक्य शिंदे, व मुलगी यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त गंगाजल महाआभिषेक करत पुजा पार पडली. 364 दिवस विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण केले जाते परंतु महाशिवरात्री असा दिवस आहे की त्या दिवशी विठ्ठल हे शैव वैष्णवाचे प्रतिक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी ही पुजा सुरु केली होती. ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर यांच्या हस्ते आमदार प्रा. राम शिंदेचा परिवार व होळकर परिवार, होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी श्री विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती देऊन ट्रस्टच्यावतीने शिंदे परिवाराचा सन्मान व सत्कार करण्यात आला.