जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी नगरसेवक अभय बोरा

कर्जत प्रतिनिधी :- जैन श्रावक संघ कर्जत मधील जैन समाजाची महत्वपूर्ण संघटना आहे. या मध्ये सर्व जैन बांधवाची वार्षिक जनरल मिटिंग दि १ मार्च रोजी जैन स्थानक कर्जत येथे खेळी-मेळी च्या वातावरणात पार पडली प्रथे प्रमाणे अध्यक्ष व संपूर्ण श्रावक संघातील सदस दर दोन वर्षांनी बदलण्याचे या वेळी ठरले यावेळी मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकजी कोठारी यांनी सर्वानुमते नवीन अध्यक्ष म्हणुन पुढील कार्याकाळासाठी कर्जत नगरपंचायत चे नगरसेवक अभय सुमतिलाल बोरा यांची निवड जाहीर केली व त्यांना जैन श्रावक संघातील सदस्य निवडण्यासाठी सर्वानुमते अधिकार देण्यात आले या वेळी जैन श्रावण संघाचे मा.खजिनदार सुरेशशेठ नहार, सदस्य विशाल छजेड, नितीन बोरा, संतोष भडारी. तसेच समाजाचे नेते रवीशेठ कोठारी, डॉ प्रकाश भडारी, निलेश बोरा, नितीन खाटेर,आशिषजी बोरा, योगेश खाटेर, अभिकेश बोरा. समाजाचे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी शुभेच्छा दिल्या.