Advertisement
ब्रेकिंग

जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विध्यार्थीचा टायगर अकॅडमीला अभ्यास सहल

Samrudhakarjat
4 0 1 9 4 7

कर्जत (प्रतिनिधी) :- मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विध्यार्थी यांनी आज टायगर अकॅडमीला भेट देऊन तेथील दैनंदिन नियोजन चा अभ्यास केला. तालुक्यात नावाजलेली व त्याचेकडील पोलीस, आर्मी, SRPF मध्ये अनेक विध्यार्थीना जॉब मध्ये कार्यरत अशी टायगर अकॅडमीचे संचालक हर्षद चौकडे सर यांनी विध्यार्थीना सकाळी 5.30 पासून रात्री 9.30 पर्यंत काय नियोजन असते कुठे काय शिकविले जाते याची खूप छान अशी माहिती दिली 100, 1600 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, इ बाबतीत माहिती दिली पोलीस कॉन्स्टेबल, आर्मी, तलाठी, होमगार्ड, SRPF, इ भरती बाबतीत माहिती दिली तसेच काही इव्हेंटच्या बाबतीत प्रात्याक्षिक करून दाखविले जिजाऊ इंग्लिश स्कूलचे अनेक विध्यार्थीनी त्याचे स्टाफने स्पर्धा परीक्षेचे मराठी, इंग्रजी ग्रामर, अंकगणित, सामान्य विज्ञान, बुद्धीमत्ता यांची विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अचूक दिली

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे यांनी बोलताना लहापपासूनच विध्यार्थीना आपण ज्या क्षेत्रात जाणार आहे स्पर्धेच्या युगात प्रत्येक टिकून राहण्यासाठी त्याची तयारी बालपणापासून करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात करतील आणि त्यांचे लक्ष्य पूर्ण करू शकतील तसेच कमी वयात देशप्रेमाची भावना मनात टिकून राहावी व भविष्यातील IPS, IAS, पोलीस, आर्मी, SRPF सारख्या क्षेत्रात करिअर करून देशाची सेवा करतील अशी भावना व्यक्त केली

तसेच टायगर अकॅडमीचे संचालक हर्षद चौकडे सर यांनी बोलताना जिजाऊ इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी खूप हुशार व चाणाक्ष आसल्याचे म्हटले नियमित व्यायाचे काय फायदे असतात तसेच जिम मधील साहित्य कसे वापरून व्यायाम कसा करायचा याचे प्रात्याक्षिक करून दाखविले लहान वयापासूनच त्यांनी काय करायचे याची याच वयात निवड करावी म्हणजे ते विद्यार्थी स्पर्धेत टिकत तसेच याचे सातत्य ठेवावे असे ते बोलत होते तसेच विध्यार्थीना खाऊ वाटप केला, जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनी टायगर अकॅडमीच्या ग्राऊंडवर वनभोजनाचा आस्वाद घेतला.

या क्षेत्र भेटीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे संस्थेच्या सचिव शर्मिला केशव शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच उर्मिला त्र्यंबके, सरिता काळाने, निकिता माळवदे, सुरेखा शेलार, प्रतीक्षा उल्हारे, प्रियदर्शनी मुंगीकर, अर्चना म्हेत्रे, मेघा अडसूळ, आशा पवार, दत्तात्रय पवार, संतोष कोरडे, जालिंदर बनकर, पांडुळे काका यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार राक्षे सर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker