कृषिदुतांनी केले केळी बागायतदारांना मार्गदर्शन

कर्जत (प्रतिनिधी) :- मौजे नांदगाव येथे डाॕ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषिदुतंमार्फत गावामध्ये केळी बागायतदार शेतकऱ्यांना पिल काढणे व बांधणी करणे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले व प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिके करून दाखवली.
केळी या फळबागांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाच्या क्रिया पील काढने व बांधणी करणे या क्रियांमुळे झाडाला अन्नद्रव्य योग्य प्रमाणात पोहचण्यास मदत होते व अतिरिक्त कोंब काढल्याने झाड खते व औषधांचा पुरेपूर उपयोग करून घेते व त्यानंतर शेताची बांधणी केल्याने माती भुसभूशीत होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते व मुळांचे जीवाणुंसोबत संघटन चांगले होते . झाडे निरोगी व मजबूत बनतात व उत्पंनामध्ये वाढ होते यांचे महत्व कृषीदुतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले
नांदगावातील प्रसिद्ध केळी बागायतदार महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते भुजंग पोपटराव निंबाळकर यांच्या केळी च्या बागेत या प्रात्यक्षिकाचे नियोजनबध्द आयोजन करण्यात आले होते. नांदगावतील केळी बागायतदार शेतकऱ्यांनी यास उदंड प्रतिसाद दिला.
त्याचबरोबर केळी या पीकांवरील रोग निंयत्रणासाठी कृषी दूतांनी एकात्मिक किड व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयातील कृषिदुत स्वरूप काळे, सूरज थोरात,ओम ठाकूर,निरंजन सावंत,गौरव जमदाडे,सार्थक थोरवे व युवराज भोर यांनी बदलत्या हवामानामुळे पिकांना व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचनीनवर मात करण्यासाठी शेतकर्यांप्रमाने आम्हीही कटिबद्ध आहोत हा विश्वास पटवून दिला .
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कृषिदुतांना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी.गायकवाड, व प्रा.एस.व्ही.बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले