ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता: १५ दिवसांत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण

Samrudhakarjat
4
0
1
2
3
5
कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ १५ दिवसांत कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या या घटनांनी सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
- राज्यातील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना:
- परभणी: सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू.
- बीड: एका सरपंचाची निर्घृण हत्या.
- नांदेड: शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुखाचे अपहरण.
- कल्याण: मराठी कुटुंबाला बेदम मारहाण.
- कल्याण: चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्यास जाब विचारल्याने कुटुंबावर हल्ला.
- पुणे: लोहगाव परिसरात कोयता गँगने वाहनांवर हल्ला करत दहशत पसरवली.
- छत्रपती संभाजीनगर: २ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगद्वारे २१.५९ कोटी रुपयांचा गंडा घातला.
- मुंबई : काँग्रेस कार्यालयावर हल्ला आणि तोडफोड.
- सोलापूर (बार्शी): जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलती आणि चुलत भावाचा खून केला.
पोलीस यंत्रणा आणि सरकारसमोरील आव्हाने या घटनांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले जात आहेत.
सामान्य नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृह खात्याने या घटनांची तातडीने दखल घेत कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
– साप्ताहिक समृद्ध कर्जत