शालेय जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा भरला 10 वी चा वर्ग..

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी. :- 21 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 29 डिसेंबर 2024 रोजी श्री जगदंबा विद्यालय राशीन च्या 2002-2003 10वी बॅच चा स्नेहमेळावा राशीन येथील अंबिका लॉन्स येथे पार पडला. एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्व मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटत होते तो क्षण हा खरच बघण्यासारखा होता सर्वजण आपले सध्याचे धकाधकीचे जीवन विसरून लहान झाले होते आणि लहानपणाच्या सर्व आठवणींना उजाळा देत होते. काहिकेल्या बोलणं हे थांबतच नव्हतं. खरतर शालेय जीवनात जे मित्र मैत्रिणी बनतात त्या कुठल्याही स्वार्थ न ठेवता बनलेल नात असते आणि हे मैत्रीचे नाते यावेळी ठळकपणे दिसून येत होते. कोण कुठला कोण पदाधिकारी बिजनेस मॅन ही बिरुदे गळून पडले होते आणि सर्व एकमेकांच्यात रममान झाले होते.
या कार्यक्रमाला जगदंबा विद्यालयाचे 2002 2003 बॅचला ज्यांनी घडवलं ते शिक्षक पण उपस्थित होते यामध्ये माजी प्राचार्य नेटके सर सध्याचे प्राचार्य साळवे सर चटाले सर खरात सर अभंग सर हेही आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेटके सर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शहाणे सर आणि सोनाली काळे यांनी उत्तम रित्या पार पाडले, यावेळी सर्व शिक्षकांनी अमूल्य अस मार्गदर्शनपर विचार मांडले. यानंतर शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील याची प्रतिमा देऊन स्वागत केले गेले. शाळेचे आणि शिक्षकांचे ऋण व्यक्त करणारे भाषण भाषण मयूर आंधळकर, आरती खोसे आणि गजानन दंडे यांनी केले. तसेच यावेळी अनेक मित्र मैत्रिणीनी आपले कला गुण कविता आणि छानसे गणे मनात सादर केले.
आता चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही बॅच यांना छानसं मार्गदर्शन पाटील मॅडम यांनीही केलं.
2002 2003 बॅच ही दरवर्षी एक ठराविक रक्कम जमा करून मैत्रीत्व फाउंडेशन या नावाने सामाजिक कार्यामध्ये भाग घेते व याही वेळेस असाच ठराव करून दरवर्षी दोन विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्या दोन विद्यार्थ्यांचे पालकत्व ही बॅच घेणार आहे असा छानसा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच आपल्या मधील काही मित्र आणि शिक्षक यावेळी आपल्यात नाहीत याची आठवण म्हणून एक दोन मिनिटे मौन मन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आवर्जून उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना एक आठवण म्हणून छानसी ट्रॉफी देण्यात आली.
सर्वांनी छानसा फेटा घालून एक विशेष आकर्षण म्हणजे पुणेरी पाट्या घेऊन हा क्षण कैद करण्यासाठी ग्रुप फोटो घेण्यात आले. सकाळी दहा वाजता चालू झालेला गेट-टुगेदर चा कार्यक्रम संध्याकाळचे सहा वाजले तरी असाच न थकता चालू राहावा असे प्रत्येकाला वाटत होते पण वेळेचे भान ठेवून सर्वांनी परत एकदा वर्षातून भेटायचं हा निश्चय करून एकमेकांचे अत्यंत जड अंतकरणाने निरोप घेतला.
कार्यक्रमाच्या आयोजनाचे ओझं हे मित्र सोयब काझी, नवनाथ धनवे, अतुल काळे , रूपाली काळे आणि सर्व मित्रांनी केले.