google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला २० लाखांचे पॅकेज; सीए उत्तीर्ण विद्यार्थ्याचाही सन्मान

Samrudhakarjat
4 8 6 0 1 8

कर्जत : दादा पाटील महाविद्यालयाच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचा महाविद्यालयात गौरव करण्यात आला. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सुरजकुमार रमेश नलवडे याची इफको (IFFCO) या नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग ऑफिसर पदावर निवड झाली असून त्याला वार्षिक २० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

सुरजकुमारने कृषिविज्ञान पदवी पूर्ण केल्यानंतर गुजरात येथे एमबीएचे शिक्षण घेतले. उत्कृष्ट गुणवत्तेच्या बळावर त्याची इफको कंपनीमध्ये उच्च पदावर नियुक्ती झाली. या यशाबद्दल महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात वाणिज्य शाखेचा माजी विद्यार्थी हेमंत शरद नेवसे याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, दीपक शिंदे, गणेश देवरे, प्रकाश धांडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर आणि प्रा. जयदीप खेतमाळीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, सदस्य अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker