शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात साजरा ३१ जानेवारी होणार

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक तसेच श्री संत सद्गुरु गोदड महाराज अधिकृत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, श्री. शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभ शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.
हा सोहळा कर्जत येथील श्री संत सद्गुरु गोदड महाराज ध्यान मंदिर, पाटील गल्ली येथे मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.ना.प्रा. राम शिंदे साहेब, सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य हे राहणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये मा.ना. मकरंदआबा पाटील, मंत्री, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य, तसेच मा.आ. संग्रामभैया जगताप, आमदार, अहिल्यानगर शहर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. सचिनभाऊ जगताप, जिल्हा परिषद सदस्य, अहिल्यानगर, मा.श्री. सुरेशराव वसंतराव पाटील, सोलापूर, मा.आ. अरुणकाका जगताप, माजी आमदार, मा.श्री. प्रविणदादा घुले पाटील, जिल्हा परिषद सदस्य, मा.श्री. अमृत भिकाजीराव पाटील, संचालक, यशवंत शिक्षण संस्था, कर्जत, आणि बाभिषण खोसे, अध्यक्ष, कर्जत व्यापारी असोसिएशन उपस्थित राहणार आहेत.
विशेष किर्तन कार्यक्रम
या दिवशी रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ. नेहाताई भोसले/साळेकर यांचे प्रेरणादायी किर्तन होणार आहे, जे सर्वांसाठी खुले असेल.
भोजन व्यवस्था
सत्कार समारंभानंतर उपस्थितांसाठी दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
संयोजक मंडळ
हा कार्यक्रम पै. प्रविणदादा घुले पाटील मित्र मंडळ, कर्जत-जामखेड, तसेच यशवंत शिक्षण संस्था परिवार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
सर्व कर्जत व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सत्कार समारंभ व किर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.