75 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर रवळगावला मिळाले स्वतंत्र पोस्ट कार्यालय…


कर्जत प्रतिनिधी : – भारत देशामध्ये पोस्टाची स्थापना होऊन 115 वर्ष झाले असून, भारत स्वतंत्र होऊनही 75 वर्षांच्या काळ लोटला. तरीही रवळगाव मध्ये पोस्ट कार्यालय नव्हते. ते आणण्यासाठी नागर फाउंडेशन ने पुढाकार घेतला. दोन वर्ष सातत्याने मेहनत, संघर्ष करत रवळगावला पोस्ट कार्यालय देण्यासाठी नागर फाउंडेशन ला यश आले. यासाठी गावातून 500 पोस्ट बचत खाते काढून, तालुका, जिल्हा, विभाग, केंद्र स्थरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

22-09-2025 रोजी रवळगावमध्ये मा. सोमनाथ तांबे साहेब, उपविभागीय डाक अधिकारी कर्जत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. आप्पा अनारसे, राज्य संघटक, युक्रांद, रवळगाव मा
सरपंच मोहन (तात्या)खेडकर, उपसरपंच मा
ज्ञानदेव खेडकर, ग्रामपंचायत सदस्य मा. संतोष खेडकर, मा.राजेंद्र रासकर,मा. दत्तात्रय तनपुरे, मा. जनार्दन तनपुरे, मा. वायाळ सर, तसेच नागर फाउंडेशन टीम, पोस्ट कार्यालय टीम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. हे पोस्ट कार्यालय रवळगाव विकासाला अधिक गती देऊन समृद्धीच्या दिशेने घेऊन जाईल. रविंद्र हनुमंत गोरे, संस्थापक अध्यक्ष नागर फाउंडेशन रवळगाव, ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर



