कोळवडी येथे ‘हॉटेल जगताप वाडा’चे भव्य उद्घाटन १ फेब्रुवारीला

कर्जत तालुक्यातील कर्जत-राशीन रोडलगत नाना नानीच्या मळासमोर कोळवडी येथे उभारण्यात आलेल्या ‘हॉटेल जगताप वाडा’ या नूतन हॉटेलचा शुभारंभ शनिवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी हॉटेलचे संचालक दिलीप जगताप आणि मिरा जगताप यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, भारतीय जनता पार्टीचे युवक नेते गणेश क्षीरसागर, कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल गदादे, कर्जत नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे, तसेच नगरसेवक संतोष म्हेत्रे, सुनील शेलार, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, ओंकार तोटे, माजी नगरसेविका मनीषाताई सोनमाळी, हर्षदाताई काळदाते, भारतीय जनता पार्टीचे युवक नेते शरद म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, हॉटेल महाराजाचे संचालक सचिन गोरे, उद्योजक सचिन कुलथे, शिवसाई पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हेत्रे, पारनेर बँकेचे शाखाधिकारी सदाशिव फरांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, उद्योजक बाळू वाळुंजकर आणि मनोज निलंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
युवक नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती:
भारतीय जनता पार्टीचे युवक नेते धनंजय आगम, गणेश गुंड, सनी कदम, रविराज गुंड, अक्षय गुंड, आजबे केटरर्सचे विकी आजबे, सुरज कोकाटे, योगेश जाधव, श्रीराम पागे, हर्षल काळे, अविनाश राऊत, सागर गुंड, ओंकार गुंड, अमर मोढळे, प्रशांत जगदाळे, प्रेम शिंदे, निलेश गुंड, शेखर गुंड, राहुल गुंड, अजिंक्य गुंड, अनिकेत गुंड, तुषार शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
हॉटेलची वैशिष्ट्ये:
‘हॉटेल जगताप वाडा’ हे खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. शांत आणि निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंगची सोय, कुटुंबांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची खासीयत ही या हॉटेलची वैशिष्ट्ये असतील. कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे ग्राहकांसाठी हे हॉटेल सहज पोहोचण्याजोगे आहे.
सर्वांना आमंत्रण : हॉटेलचे संचालक दिलीप आणि मिरा जगताप यांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून हॉटेलचा अनुभव घ्यावा, असे आवाहन केले आहे.