जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कर्जत (प्रतिनिधी): – कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. शाळेच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कटारिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरण देशभक्तीमय झाले.
यावेळी शाळेत हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून महिलांनी एकोप्याचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्ये देत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास उद्धव नेवसे, संजय पवार, किरण खिळे, डॉ. सुभाष सूर्यवंशी, बबन म्हस्के, डॉ. काळदाते, सचिव शर्मिला केशव शिंदे यांच्यासह सहशिक्षिका उर्मिला त्र्यंबके, सरिता काळाने, निकिता माळवदे, सुरेखा शेलार, प्रियदर्शनी मुंगीकर, कांचन फुटाणे, मोनिका गागर्डे, स्नेहल वतारे, संगीता रायकर, आशा पवार, प्रणव वतारे, दत्तू सकट, विकास पवार तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक-शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत देशसेवेचा संदेश दिला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगानाने करण्यात आला.