श्री जगदंबा देवी नवरात्री उत्सव सोहळ्या दरम्यान मुख्य रस्ते स्वच्छ ठेवा : शाम कानगुडे.


राशीन येथील श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सव सुरू झाला असून दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातूनभाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे महामार्गावरील रस्ते स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित प्रशासनाच्या वतीने बारामती अमरापुर व दौंड धाराशिव मुख्य रस्त्याचे स्वच्छता मोहीम मा. सभापती श्याम कानगुडे यांनी संबंधित अधिकारी यांना दिलेल्या तंबी मुळे स्वच्छता मोहीम तात्काळ सुरू झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूची साफसफाई कर्मचारी करीत आहेत.

श्री जगदंबा देवी नवरात्री व दसरा पालखी, सोहळा पार पडेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वाकचौरे साहेब यांनी मुख्य रस्त्यावरील सफाईवर लक्ष केंद्रित करून यात्रेदरम्यान स्वच्छता ठेवण्यास आदेश कर्मचाऱ्यांना द्यावेत. तसेच श्री जगदंबा देवी यात्रेच्या तोंडावर राशीन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कापरे व प्रशासक जगताप यांनी ऐन यात्रेवेळी पाठ फिरवून सक्तीच्या रजेवर गेल्यामुळे राशिन गावातील अंतर्गत रस्त्यावरील गल्लीबोलातील कचऱ्याचा प्रश्न अद्याप देखील सुटलेला नाही. तरी प्रभारी स्थानिक प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष ठेवावे. नाहीतर आम्हाला यात्रे दरम्यान स्वच्छतेच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरावे लागेल असा जहरी इशारा मा. सभापती व कानगुडवाडीचे मा.सरपंच श्याम कानगुडे यांनी दिला आहे.




