जिजाऊ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश


राशीन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित महाविद्यालयीन आंतरविद्यापीठ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत राशीन येथील जिजाऊ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यश मिळवले.
कुस्ती फ्रीस्टाईल ७४ किलो वजन गटात प्रथम वर्षातील प्रदीप जांभळे व प्रदीप मोहिते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेत केशव अमृत भंडारे यांनी उत्तम प्रदर्शन करत विभागीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळविला.
या विजयी खेळाडूंना फिजिकल डायरेक्टर प्रा. किशोर पवार व कुस्ती कोच विक्रम शेटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. केशव नामदेवराव शिंदे, सचिव क्रिश शिंदे, प्राचार्य अमृत पांडुळे, फिजिकल डायरेक्टर प्रा. किशोर पवार, कुस्ती कोच पै. विक्रम शेटे यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




