कर्मवीर जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न


कर्मवीर जयंती सप्ताहनिमित्त रयत संकुल कर्जत व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समिती सदस्य आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला. आमदार रोहितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व स्पर्धकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, चॅलेंज स्वीकारा तर स्टार बनवू शकाल. संधीचे सोने करा, स्पर्धेतून नेहमी आत्मविश्वास वाढत असतो. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा. चांगल्या मित्राची संगत करा. रयत म्हणजे शिस्त आहे आणि त्या शिस्तीचे पालन करा. जीवनातील प्रत्येक स्पर्धेला गांभीर्याने घ्या असा संदेश याप्रसंगी दिला.

या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी नामदेव राऊत, बाळासाहेब साळुंके, सुभाषचंद्र तनपुरे, दीपक शिंदे, विशाल म्हेत्रे, प्रकाश धांडे, श्रीमंत शेळके, ऋषिकेश धांडे, भूषण ढेरे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेत सोनाली दादा सरोदे, आकांक्षा बाळासाहेब निंबोरे, दिपाली आप्पासाहेब बागल यांना उत्तेजनार्थ क्रमांकाचे प्रत्येकी तीन हजार रुपये व मेडल, रोहिणी संतोष कुऱ्हाडे, तृतीय क्रमांकाचे पाच हजार रुपये व कांस्यपदक, दीक्षा आनंदराव जाधव, द्वितीय क्रमांकाचे सात हजार रुपये व रौप्यपदक, वैष्णवी साईनाथ जगधने, प्रथम क्रमांकाचे अकरा हजार रुपये व सुवर्णपदक प्राप्त केले.

मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत आदित्य युवराज गलांडे, तुषार खोमणे, ओम अनिल खताळ यांनी उत्तेजनार्थ स्वरूपाचे तीन हजार रुपये व मेडल प्राप्त केले. गणेश भारत बांदल, तृतीय क्रमांकाचे पाच हजार रुपये व कांस्यपदक, गणेश बाळासाहेब चौधरी, द्वितीय क्रमांकाचे सात हजार व रौप्यपदक, ओम अनिल गदादे, प्रथम क्रमांकाचे अकरा हजार व सुवर्णपदक प्राप्त केले.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अशोक शिंदे व क्रीडा शिक्षक प्रा. पवन कडू, प्रा. अनिल सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.



