कर्जत शहरात प्रभाग क्रं ८ मधील विविध भागात पर्यावरण पूरक हळदी कुंकू व कापडी पिशव्या वाटप कार्यक्रम

कर्जत (प्रतिनिधी):- माझी वसुंधरा अभियान 0.3 अंतर्गत कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन केले असुन या अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील शिक्षक कॉलनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, 25 बंगले शेजारील पाण्याची टाकी सर्मथ कॉलनी या तिन्ही ठिकाणी त्या त्या भागातील महिला-भगिनींनी उपस्थित राहून पर्यावरण पूरक हळदी-कुंकू, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड अशा आकाश, वायु,अग्नि, जल, जमीन या पर्यावरणाच्या पंचतत्वावर दि.१०/०३/२०२३ रोजी कार्यक्रम संपन्न झाला.
प्रभाग क्रं ८ मधील शिक्षक कॉलनी,बालाजीनगर, पंचवीस बंगले पाण्याची टाकी सर्मथनगर या तिन्ही ठिकाणी पर्यावरण पूरक हळदी-कुंकू कार्यक्रम, पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक पिशव्यावर बंदी, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करण्यात आले.
संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात असुन हळदी-कुंकू कार्यक्रमात एकत्र येताना, महिलांनी विचारांचा जागर करणे आवश्यक आहे म्हणून सर्व महिला भगिनींनी यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी वाण म्हणून महिलांना कापडी पिशवी व भारतीय प्रजातीचे रोप भेट स्वरूपात देण्यात आले.
यावेळी उपस्थित महिला-भगिनींनी पर्यावरण पूरक हरित शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा निश्चय केला.या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांच्या सह त्यांच्या कुटुंबातील महिला-भगिनींनी केले.
कार्यक्रमासाठी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत, नगरपंचायतचे अधिकारी तुकाराम सांगळे तसेच विलास शिंदे, राकेश
गदादे व मराठमोळ्या वेशभूषेत या कार्यक्रमात प्रभागातील तिन्ही ठिकाणच्या महिला-भगिनींनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमासाठी प्रभागातील महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.