google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

प्रा. राम शिंदे साहेब यांच्या विजय आणि पराजय श्रेयाच्या जबाबदारीची काळजी सचिन घुले यांनी करू नये.

स्वप्निल तोरडमल -तालुका सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा कर्जत 

Samrudhakarjat
5 1 9 5 3 2

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायामध्ये नगराध्यक्ष पद मिळवताना ज्या सद्गुरू गोदडनाथाच्या नावाचा वापर करून शपथा घेऊन पुन्हा मामुली सत्तेच्या लालसेपोटी जनतेशी गद्दारी करणाऱ्यांनी आपली लायकी ओळखून प्रा राम शिंदे साहेब यांच्या वर टीका करावी. विधानसभा 2024 मध्ये भाजपा तालुका संघटनेने आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट घेतले त्यामुळे एका बलाढ्य शक्तीला रोखण्यात यश आले. परंतु रोहित पवारांना शिव्या देऊन भाजपामध्ये प्रवेश न करता मदत केली म्हणणाऱ्यांनी श्रेयासाठी धडपडू नये. लोकांच्या मनात असणारा प्रा राम शिंदे साहेब यांच्या बद्दलचा विश्वास आणि तत्कालीन भाजपा तालुका पदाधिकारी यांना संघटना बांधणीसाठी केलेली मदत प्रत्येक बूथवर राबवलेले कार्यक्रम बूथ अध्यक्षांपर्यंत संपर्क आणि भाजपाने राज्यात केलेले काम यांचा तो विजय आहे. त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्यांना वास्तव चित्राची कल्पना येणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी विजय किंवा पराजय याचे पोकळ दावे करून प्रा राम शिंदे साहेब यांच्यावर चिखल फेक करण्याने तुमची उंची वाढणार नाही हे लक्षात घ्या. 

       रोहित पवार हे जर तुम्हाला राज्याचे नेते वाटत असतील तर तीन वर्ष त्यांच्या नेतृत्वात काम करून पुन्हा त्यांच्यावरच अविश्वास व्यक्त करण्याची आणि बंड करण्याची गरज तुम्हाला का वाटली.

        रोहित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रा राम शिंदे साहेबांच्यावर दुगाण्या झाडण्याची आपली भाषा तुमचा मानसिक पराभव दर्शवते. यामुळे येथून पुढे अशा टीकेला त्याच शब्दात उत्तर दिले जाईल. 

जामखेड नगर परिषदेमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया साहेबांनी स्वतःच्या हातामध्ये ठेवली होती. जामखेड नगरपरिषद भाजपाचे निवडणूक प्रभारी श्री शेखर खरमरे यांच्याबरोबर सतत तीन दिवस प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखतीसाठी वेळ दिला .त्यानंतर प्रत्येक प्रभाग निहाय पक्ष निरीक्षक नेमले जान्वय पक्ष संघटना आणि उमेदवार यामध्ये समन्वय करून ही निवडणूक जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत नेली त्यामुळेच तिथे विजयाचा गुलाल पडला.  सुरेश धस हे भाजपाचे नेते आहेत त्यामुळे त्यांची मदत पक्षाला झाली. त्यांचे योगदान नाकारण्याचा प्रश्न नाही. पण त्यांचे योगदान तुमच्यासारख्या पक्षाबाहेरील व्यक्तीने सांगण्याची गरज नाही – स्वप्निल तोरडमल -तालुका सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा कर्जत 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker