google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री जगदंबा देवी नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ; घटस्थापना संपन्न

Samrudhakarjat
5 1 9 5 1 5

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):

प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असलेल्या राशीन येथील श्री जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सवास आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता श्री जगदंबा मातेची विशेष पूजा पार पडली. ही पूजा श्री. अक्षय शेटे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजता घटस्थापना करण्यात आली.

या धार्मिक विधीदरम्यानाआखोबा स्वामी शेटे यांचे वंशज श्री. अक्षय स्वामी शेटे व पुजारी सुनील रेणुकर तसेच ग्रामजोशी संदीप देवा सागडे यांनी मंत्रोच्चार करत घटस्थापना विधी पार पाडला.

याप्रसंगी शेटे परिवारातील श्री. शिवदासजी शेटे, श्री. शरद शेटे (सर), महेश शेटे, अमोल शेटे, सागर शेटे, उमेश शेटे, तसेच विश्वास रेणुकर, विशाल रेणुकर, ज्ञानेश्वर रेणुकर, मंगेश वाघमारे, मिलिंद रेणुकर, ॲड. युवराजसिंग राजे भोसले, प्रवीणशेठ आंधळकर, सुभाषशेठ देवगावकर, अनिकेत देवगावकर, औदुंबर देवगावकर, तुकाराम सागडे, मनोज विसापूरे, विजय नाना मोढळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त, सेवेकरी, मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी राशीन व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली असून, संपूर्ण मंदिर परिसर ‘जय जगदंबा’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker