google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशिन मध्ये आयडियल डिजिटल संगणक लॅब चे उद्घाटन संपन्न…

Samrudhakarjat
5 1 8 6 1 9

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राशीन मुले येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचेकडून आलेल्या आयडियल डिजिटल लॅबचे उद्घाटन आज कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी लॅब चे उद्घाटन 

रिबन कापून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी लॅबची पाहणी केली. अतिशय सुसज्ज अशी ही लॅब शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग साठी उपयोगी येणार आहे. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी प्रयोगातून आनंददायी शिक्षण घेणार आहेत. लॅबची पाहणी केल्यानंतर विद्येची खरे देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अशोक नेवसे यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी या आयडियल डिजिटल लॅब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच सुधारेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राशीन केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र माळवदकर हेही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आदर्श बहुजन शिक्षक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष नवनाथ अडसूळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी बोलताना विद्यार्थ्यांना या लॅबचा पुरेपूर लाभ घेऊन अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले. यावेळी राशीन मुली शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वावगे,शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य निलेश पवार, नागेश मरकाम ,सदस्या जाधव ताई तसेच आढाव ताई उपस्थित होत्या. पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक राजीव राठोड, उज्वला पंडित, स्मिता गुनवरे, रेणुका चव्हाण, विजया जगताप, भारती जाधव यांनीही परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भास्कर घोडके यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप कोकाटे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker