google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

स्टेट बँकेला शिवसेनेचा अल्टिमेटम; पाच दिवसांत प्रश्न सोडवा, अन्यथा टाळे ठोकण्याचा इशारा!

पथविक्रेत्यांच्या कर्जप्रकरणांवरून शिवसेना आक्रमक; तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली शाखाधिकाऱ्यांना निवेदन

Samrudhakarjat
5 1 9 0 0 5

कर्जत (प्रतिनिधी) : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्जत शहरातील व्यावसायिकांची कर्जप्रकरणे प्रलंबित असल्याचा आरोप करत शिवसेनेने भारतीय स्टेट बँकेच्या कर्जत शाखेला धडक दिली. कर्जप्रकरणांमधील कथित दिरंगाई दूर करून व्यापाऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शाखाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. येत्या पाच दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास बँकेला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कर्जत शहरातील काही व्यावसायिकांची प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्जप्रकरणे मंजूर होण्यासाठी प्रलंबित असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील युनियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र येथे संबंधित कर्जप्रकरणे मार्गी लावण्यात आली असताना, भारतीय स्टेट बँकेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रलंबित कर्जप्रकरणांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बँक प्रशासनाने पाच दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बँक प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कर्जप्रकरणांचा प्रश्न सुटला नाही, तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि बँकेला टाळे ठोकून निषेध नोंदवेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबत बँक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांच्यासह प्रसाद कानगुडे, चंदनसिंग परदेशी, वैभव शिंदे, अनिल थोरात, तुषार धांडे, अमोल घालमे आणि ऋषिकेश बरबडे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आता शिवसेनेने दिलेल्या पाच दिवसांच्या मुदतीत स्टेट बँक प्रशासन संबंधित कर्जप्रकरणांवर काय कार्यवाही करते आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे कर्जत शहरातील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker