google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर – नंदलाल काळदाते

Samrudhakarjat
5 1 8 3 2 4

कर्जत :- कर्जत तालुक्यातील दुष्काळाची दाहकता पाहण्यासाठी केंद्र सरकारचे पथक तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या पथकाने टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात, वालवड, रेहेकुरी या गावांना भेट देत प्रत्यक्ष दुष्काळ पाहणी केली.

यावेळी चिंचोली काळदात येथे पथक आले असता, यावर्षीच्या दुष्काळाची भयावह सत्य परिस्थिती पथकासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती भाजपा तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी दिली.

पथक प्रमुख के. पोन्नुस्वामी (केंद्रीय संचालक, पीक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी आयुक्त सौरभ मांढरे यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

पथकाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :-

१) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न – सरकार सध्या प्रतिमानसी २० लिटर पाणी देत आहे, त्याऐवजी ४० लिटर करण्यात यावे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी पकडली गेलेली जनगणना २०११-१२ ची असून, त्यामुळे टँकर देताना अडचणी येत आहेत, त्यात तात्काळ बदल करावा.

२) पिकांची भयावह स्थिती – करपलेल्या पिकातून दुष्काळाची दाहकता स्पष्ट जाणवत होती. कोणत्याही शेतकऱ्याच्या हाती पीक लागेल अशी परिस्थिती राहिलेली नाही.

३) फळबागा जळण्याच्या मार्गावर – १०-१५ वर्षे जपलेल्या फळबागा जळण्याच्या मार्गावर असून ही अत्यंत गंभीर बाब पथकाच्या निदर्शनास आणून दिली.

४) पशुधन संकटात – शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आर्थिक कणा असलेले पशुधनही संकटात सापडले असून, ते वाचवण्यासाठी तातडीने चारा-पाण्याची सोय करावी.

५) रोजगार निर्मिती – गावातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र व राज्य स्तरावरील MREGS (नव्याने G Ram G झालेली) सारख्या योजना तातडीने सुरू कराव्यात.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा कृषी अधिकारी बोराळे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार रवी सतवन, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी वाणी, तलाठी खताळ, ग्रामविकास अधिकारी वळेकर, कृषी सहाय्यक सरोदे यांच्यासह सरपंच बापूसाहेब काळदाते, रघु आबा काळदाते, उपसरपंच गणेश काळदाते, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कर्जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयावह असून शेतकऱ्यांच्या हातात पीक येण्याची आशा उरलेली नाही. अनेक वर्षे जपलेल्या फळबागा जळण्याच्या मार्गावर आहेत, तर पशुधनही चारा-पाण्याअभावी संकटात आहे. केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिली असून, शेतकऱ्यांना तातडीने पाणी, चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही पथकाकडे केली आहे.” – नंदलाल काळदाते भाजपा तालुका सरचिटणीस, कर्जत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker