google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कापरेवाडी–शिंदेवाडीत ब्लॅकमेलिंग, खोट्या तक्रारींचा आरोप; ‘विरोधाला विकासकामांनी उत्तर देणार’

Samrudhakarjat
5 1 7 8 1 2

कर्जत (प्रतिनिधी) : कापरेवाडी–शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांमध्ये गेल्या चार वर्षांपासून ब्लॅकमेलिंग, खोट्या तक्रारी आणि जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे यांनी केला आहे. गावाच्या विकासासाठी मूलभूत सुविधांची कामे हाती घेतली असताना काही व्यक्तींकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा दावा करत त्यांनी अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध केला.

सन २०१२ ते २०२२ या दहा वर्षांच्या कालावधीत गावातील अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित राहिले होते, असे खराडे यांनी नमूद केले. सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गावातील वीज, रस्ते आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे सुरू करण्यात आली. मात्र, ही कामे करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

गावातील नागरिकांच्या मागणीनुसार, उपलब्ध निधी आणि शासनाच्या नियमांच्या चौकटीत वैयक्तिक तसेच सार्वजनिक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे खराडे यांनी स्पष्ट केले. गावातील नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव न करता विकासकामे करणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण करणे, तक्रारी दाखल करणे आणि चुकीची माहिती पसरविणे असे प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारांमुळे विकासकामांबाबत नकारात्मक वातावरण तयार होत असून, विकासाची गती कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची बाजू समोर आलेली नाही.

‘विरोधाला विरोधाने नव्हे, तर विकासकामांनी उत्तर देणार!’ अशी ठाम भूमिका मांडत कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या हितासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचे सरपंच अनिल खराडे यांनी स्पष्ट केले.

गावाचा विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेचा विश्वास हीच आपली ताकद असल्याचे सांगत विकासकामांत अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींनी गावाच्या हिताचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

“गावाचा विकास हेच ध्येय, जनतेची सेवा हेच कर्तव्य!” या भूमिकेतून कापरेवाडी–शिंदेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच अनिल खराडे यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker