google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
गुन्हेगारीब्रेकिंग

कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिरजगाव पोलिसांकडून आरोपीला ताब्यात

Samrudhakarjat
5 1 6 8 5 3

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम भाऊसाहेब ननवरे (रा. नवसरवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या ४० वर्षीय नातेवाईकाने मिरजगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास नवसरवाडी येथील तुळजाभवानी मंदिराजवळ घडली. आरोपी शुभम ननवरे याने पीडित मुलीचा विनयभंग करून तिला त्रास दिला. यानंतर गुरुवारी, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. ३६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७४, ७८, ३५२, ३५१(२) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास मिरजगाव पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker