google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
uncategoryब्रेकिंग

‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं असून वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Samrudhakarjat
5 1 6 4 2 3

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं निधन झालंय. दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नानांच्या अकाली एक्झिटनं मनोरंजनसृष्टी पोरकी झालीय.

हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला.

खरं तर ‘नटसम्राट’ म्हटलं तर, जुन्या पिढीला रंगभूमीवरचे श्रीराम लागू आठवतात. पण, सिनेमे पाहून मोठे झालेल्या पिढीला, जर विचारलं तर मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर रुपेरी पडद्यावर ‘नटसम्राट’ मोठं करणारे नाना पाटेकरच उभे राहतात.

रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

नाना पाटेकर यांनी ‘गमन’ 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्ष नाना सिनेमात मिळेल ती भूमिका करत राहिले ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ या सिनेमांतही नानांनी काम केलेलं. यांपैकी एकही सिनेमा विशेष कमाई करू शकला नाही.

राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आज की आवाज’ सिनेमात नाना पाटकेर सहनायक होते. नानांच्या कामाचं कौतुक झालं, पण सिनेमा काही चालला नाही. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘अंकुश’ हा सिनेमा. 1986 मध्ये आलेल्या सिनेमात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.

‘सलाम बॉम्बे’ आणि ‘परिंदा’नं ओळख निर्माण केली

1988 मधील ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने नानांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. मात्र 1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker