google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्यात संभाजी ब्रिगेडचा पक्षविस्ताराचा संकल्प; गावागावांत संघटन मजबूत करण्याचे इंजि. शामभाऊ जरे यांचे आदेश

Samrudhakarjat
5 0 5 4 8 6

कर्जत, दि. २४ (प्रतिनिधी) :  – कर्जत तालुका संभाजी ब्रिगेड पक्षाची आगामी काळातील रणनीती आणि पक्षविस्तार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची आढावा बैठक नुकतीच कर्जत येथे उत्साहात संपन्न झाली. आगामी काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी काम उभे करत असतानाच, प्रत्येक गावामध्ये जाऊन पक्षाचे मजबूत नेटवर्क तयार करण्याचे आदेश संभाजी ब्रिगेडचे अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. शामभाऊ जरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. दिलीप आबा वाळुंज व श्रीगोंदा अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष मा. सद्दाम भाई शेख उपस्थित होते. बैठकीचे नियोजन कर्जत तालुकाध्यक्ष मा. वैभव लाळगे यांनी केले होते. यावेळी तालुका कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवा: जरे

बैठकीत मार्गदर्शन करताना इंजि. शामभाऊ जरे म्हणाले, “संभाजी ब्रिगेडने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढा दिला आहे. आता राजकीय क्षेत्रातही पक्षाची पकड मजबूत करण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारण डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत आणि पक्ष संघटना अधिक गतिमान करावी.”

दरमहा घेणार आढावा बैठक: वैभव लाळगे

तालुकाध्यक्ष वैभव लाळगे यांनी कर्जत तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे मोठे संघटन उभे करून लोकहिताचे कार्य करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यात पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याला नियमितपणे आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीला कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी स्वप्नील शिंदे, साबीर बागवान, ऋतुराज भोसले, निखिल शिंदे, सुशांत कदम, श्रीहरी जगताप, सिद्धार्थ भैलुमे, नवनाथ शिंदे, नागेश खेडकर, कालिदास शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker