google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दुष्काळ निवारणासाठी राशीनमध्ये भक्तिभावाने चंडीयाग; जगदंबा देवीच्या चरणी पावसासाठी साकडे

Samrudhakarjat
5 0 5 6 3 6

राशीन (प्रतिनिधी, जावेद काझी):

कर्जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडावा, दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी, पशुधन व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, या मंगलमय भावनेतून राशीन येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी मंदिराच्या सिंहाच्या आवारात शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) अतिशय भक्तिमय व उत्साही वातावरणात हवनयुक्त चंडीयाग, महादेवाचा रुद्राभिषेक आणि वरुणदेवता पूजन संपन्न झाले.

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र (अहिल्यानगर दक्षिण विभाग) आणि श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट, राशीन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चार, हवनकुंडातील अग्निहोत्र आणि भाविकांच्या श्रद्धेने संपूर्ण मंदिर परिसरात एक वेगळेच आध्यात्मिक व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

विविध भागांतून भाविकांची मोठी उपस्थिती

या धार्मिक सेवा उपक्रमासाठी राशीनसह कर्जत, मिरजगाव, माहिजळगाव, घोगरगाव, जामखेड, श्रीगोंदा, बीड, दौंड, करमाळा, भिगवण, बारामती तसेच अहिल्यानगर शहरातून महिला-भगिनी व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंदाजे ७०० हून अधिक भाविकांनी या सर्व धार्मिक विधींमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

जलसमृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना

चंडीयागाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी व वरुणराजाची कृपादृष्टी लाभून सर्वत्र भरपूर पाऊस पडावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच महादेवाच्या रुद्राभिषेकासह वरुणदेवतेचे पूजन करून श्री जगदंबा देवी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी पावसासाठी साकडे घालण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राशीन येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. “पाऊस भरपूर पडू दे, धरती हिरवीगार होऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे,” या सामूहिक भावनेने पार पडलेल्या या उपक्रमातून कर्जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुख, समृद्धी आणि जलसमृद्धीची प्रार्थना करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker