google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

स्पीड ब्रेकरचा सापळा! मार्किंग नसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

Samrudhakarjat
4 8 5 9 0 7

कर्जत प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथील गजेंद्र नवनाथ जरे (वय ४०) हे माहिजळगाव येथून आपल्या घरी नवसरवाडीकडे दुचाकीवरून जात असताना दत्त मंदिराजवळील स्पीड ब्रेकर न दिसल्याने त्यांचा गंभीर अपघात झाला. स्पीड ब्रेकरवर कोणतेही रंगीत मार्किंग अथवा इशारा फलक नसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर जखमी अवस्थेतील गजेंद्र जरे यांना तातडीने मदत करण्यात आली. लाईफ फायटर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे त्यांना मिरजगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

घटनास्थळी शरद लाड, शुभम सुळसकर तसेच वैभव गायकवाड यांनी तत्परता दाखवत जखमीस मदत करून त्यांचा रुग्णवाहिकेत उपचारासाठी रवाना केले…

दरम्यान, संबंधित स्पीड ब्रेकरचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र स्पीड ब्रेकरवर आवश्यक ते मार्किंग, रिफ्लेक्टर किंवा सूचना फलक नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या निष्काळजीपणामुळेच अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

स्पीड ब्रेकर की मृत्यूचा सापळा?

दत्ता मंदिर परिसरातील स्पीड ब्रेकरवर कोणतेही स्पष्ट मार्किंग नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. यामुळे भविष्यात आणखी अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने रंगकाम व सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker