pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
गुन्हेगारीब्रेकिंग

कर्जत पोलिसांची गोवंश जनावराची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तस्करा विरुद्ध धडाकेबाज कामगिरी

Samrudhakarjat
4 6 7 6 0 1

(कर्जत प्रतिनिधी) :- दिनांक 07/04/2026 रोजी सकाळी 09/15 वा.चे सुमारास, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार,पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे,होम हर्षल गावडे, निलेश जगदाळे असे आम्ही पोलीस निरीक्षक सो यांचे आदेशाने राशीन दूरक्षेत्र हद्दीमध्ये लॅपटॉप पोर्टेबल प्रिंटर सील साहित्यसह पेट्रोलिंग व अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी खाजगी वाहनाने चिलवडी येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण सुतार यांनी आम्हा सांगितले की आत्ताच मला गुप्त बातमीदार अमार्फत बातमी मिळाली की राशीन ते करमाळा रोडने मारुती सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची सुपर कॅरी चार चाकी वाहनात गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाली असून आपण सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करू असे सांगितल्याने पोहे का प्रवीण सुतार यांनी लागलीच दोन लाख पंचांना चिलवडी गावचे शिवारात राशीन ते करमाळा जाणारे रोडवर हरवून शेख यांचे वीट भट्टी समोर बोलावून घेऊन त्यांना सदर बातमीतील हकीगत समजावून सांगून पंचनामा करणे कामी सोबत राहण्यास सांगितल्याने सदरपंचांनी त्या सहमती दिली असता आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे चिलवडी गावचे शिवारात राहशील ते करमाळा जाणारे रोडवर हरवून शेख यांचे वीट भट्टी समोर थांबलो असता आम्हाला बातमीतील हकीगत प्रमाणे राशन कडून करमाळ्याच्या दिशेने सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची सुपर कॅरी चार चाकी वाहन येताना दिसले असता आम्ही पोलीस स्टाफ व पंचांनी सदर वाहनास दिनांक 07/04/2026 रोजी 11/20 वा चे सुमारास हात दाखवुन वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहनावरील चालक याने वाहन थांबविले. त्यानंतर चालक यास आम्हा पोलीस व पंचांची ओळख करुन देवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय अशोक जगदाळे राहणार जगदाळे वस्ती मोरगाव ता.बारामती जि.पुणे असे सांगितले. त्यानंतर त्याचे ताब्यातील वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता सदर वाहनाचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम एच 42 बी.एफ 3701 असा असुन सदर गाडीमध्ये मागील हौदयात गोवंश जातीचे जनावरे दिसली तेव्हा त्यास सदर जनावरे कोणाचे मालकीची आहेत व कोठे चालवली आहेत याची विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरची जनावरे ही 1. इरफान हशम कुरेशी राहणार खडकपुरा गल्ली खर्डा ता. जामखेड जि अहिल्यानगर याचे मालकीची असुन ती कत्तलीसाठी चालविली असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्हा पोलीस व पंचाची खात्री झाल्यानंतर सदरची गोवंश जातीचे जनावरे व मारुती सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची सुपर कॅरी चार चाकी गाडीची दोन पंचासमक्ष

पाहणी केली असता त्याचे वर्णन खालील प्रमाणे

1) 25000/- रु कि चे काळया रंगाची 01 गोवंश जर्शी जातीचे गाय किं अं. 2)25,000/- रु कि चे काळया पांढ-या रंगाची 01 गोवंश जर्सी जातीची गाय कि अं.  3) 4,50,000/- रु कि.चे 01 मारुती सुझुकी सुपर कॅरी कंपनीची चार चाकी गाडी तिचा पांसिग नंबर एम एच 42 बी.एफ 3701असा असलेली जु . वा. कि. अं. 5,000,00/- रु. एकूण,

येणे प्रमाणे आज दि.07/04/2026 रोजी सकाळी 11/20 वा. चे सुमारास चिलवडी गावचे शिवारात राशीन ते करमाळा जाणारे रोडवर हरून शेख यांचे वीटभट्टी समोर ता कर्जत जि अहिल्यानगर येथे वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जर्शी, जातीचे जनावरे ही मारुती सुझुकी सुपर कॅरी सिल्वर रंगाचा चार चाकी गाडी तिचा पांसिग नंबर एम एच 42 बी.एफ 3701 गाडीतुन जनावरांना चारापाण्याची व्यवस्था न करता, त्यांना यातना व पिडा होईल अशा पध्दीतीने दाटीवाटीने भरुन दाव्याने बांधलेल्या स्थितीत कत्तल करण्यासाठी घेवुन जात असताना मिळुन आले. त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण सुतार यांनी दोन पंचासमक्ष पंचनामा करुन सदरची गोवंश जातीचे जनावरे व चारचाकी वाहन ताब्यात घेवुन राशीन दूरक्षेत्र येथे येऊन 1) चालक अक्षय अशोक जगदाळे रा.जगदाळे वस्ती ,मोरगाव ता.बारामती जि.पुणे 2) इरफान हशम कुरेशी रा. खडकपुरा गल्ली खर्डा ता.जामखेड जि.अहिल्यानगर यांचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल1048 दीपक शिवमूर्ती कोल्हे यांचे फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ) (ब), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविने प्रतिबंधक कायदा कलम 3.11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार हे करत असून सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुरमे सो, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग कर्जत श्री प्रवीण लोखंडे सो यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सोपान शिरसाट यांचे आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण बारवकर, राजेंद्र थोरात पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे,अमोल रायकर, होमगार्ड हर्षल गावडे अक्षय जगदाळे,अशांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker