pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री.शिवाजीराव लांगोरे (काका) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Samrudhakarjat
4 6 7 2 4 0

(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत तालुका साहित्य प्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे ग्रामीण साहित्य संमेलन (दुसरे) मध्ये ज्येष्ठ शिक्षणप्रेमी व यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव श्री. ल. के. तथा शिवाजीराव लांगोरे (काका) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष व माजी आमदार श्री. लहू कानडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर बहुजन समता पार्टीचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, संमेलनाचे मावळते अध्यक्ष दंगलकर नितीन चंदनशिवे उपस्थित होते. 

दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शिक्षणविस्तारासाठी यशवंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लांगोरे काका यांनी केलेले दीर्घकालीन कार्य, शैक्षणिक चळवळीला दिलेले योगदान आणि समाजहिताची जपलेली बांधिलकी याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला प्रेरणादायी ठरवले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker