कर्जतकरांसाठी दिलासादायक आरोग्यसेवा! ‘साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक आयसीयू व ट्रामा सेंटर
विविध शस्त्रक्रिया, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा — आधुनिक उपचार आता कर्जतकरांच्या दारी


कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ मनोज कापसे यांचे साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर युनिट येथे आधुनिक आयसीयू, ट्रामा सेंटर सुरू करण्यात आले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि कॅशलेस विमा सुविधा यामुळे कर्जतकरांसाठी हे हॉस्पिटल मोठा दिलासा ठरत आहे.
या रुग्णालयात मुळव्याध, भगंदर यांसारख्या आजारांचे निदान व उपचार, दुर्बिणीद्वारे पोटाचे ऑपरेशन, हर्निया, सर्पदंश व विषबाधा उपचार, हाडांच्या शस्त्रक्रिया, पॅरालिसिस व अपेंडिक्स यांसारख्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांसाठी वातानुकूलित अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रुग्णांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी हॉस्पिटलमध्ये Star Health Insurance, SBI General Insurance, Mediassist TPA, MD India TPA, Go Digit, Manipal Cigna, Niva Bupa, Cholamandalam, Navi General, Universal Sompo, Future Generali,Oriental insurance ,New India assurance co.Ltd, Paramount TPA ,यांसह अनेक विमा कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत.
हे रुग्णालय बालाजी इस्टेट, एच.पी. गॅस एजन्सी समोर, कर्जत-मिरजगाव रोड,(ब्लू डायमंड मोबाईल शॉपपी चा वर) ,कर्जत जि. अहिल्यानगर येथे असून अधिक माहितीसाठी मो. 7888034826 / 9561084791 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जत व परिसरातील नागरिकांना आता मोठ्या शहरात धाव घेण्याची गरज न पडता अत्याधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.



