आई-वडिलांचे स्वप्न साकार करा….नवनाथ अडसूळ


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पठारवाडी’ येथे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात ‘ शाश्वत विकासात युवकांचे योगदान’ या विषयावर नवनाथ अडसूळ बोलत होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, विद्यार्थ्यांनी व्यवसाय कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. काळावरून बदलले पाहिजे. यश मिळवण्यासाठी प्रत्येकाने आतृप्त रहावे. वेळेचे नियोजन करून यशासाठी सातत्याने प्रयत्न करावा. वाचनाचा व्यासंग वाढवला पाहिजे. स्वकर्तृत्वावर उभे राहून आई-वडिलांची स्वप्ने साकार केली पाहिजेत, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सुनील क्षीरसागर, महेश लांडगे, स्वाती अडसूळ, पठाडे महाराज, शेखर पठाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक्षा समुद्र या विद्यार्थिनीने तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते…




