हशु आडवाणी विद्यालयातील कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा कर्जत येथील दुय्यम न्यायालय अभ्यास दौरा…


(राशिन प्रतिनिधी जावेद काझी) :- हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथील इ .11वी कला शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा दिनांक 16/ 01/2026 रोजी कर्जत येथील दुय्यम न्यायालय या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात न्याय मंडळाची भूमिका हे प्रकरण आहे त्याची सखोल माहिती घेण्यासाठी आणि न्यायालयास प्रत्यक्ष भेट देण्यास विद्यार्थी गेले होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र नष्टे सर , प्रा. विठ्ठल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विषयाचे प्रा.मुस्ताक शेख यांच्या नियोजनाने कर्जत येथील दुय्यम न्यायालयात विद्यार्थ्यां सोबत सहकारी शिक्षक प्रा.विजय शेलार सर व श्रीम.ललिता कांबळे मॅडम हे उपस्थित राहिले.

तालुक्याचे ज्येष्ठ वकील वकील संघाचे अध्यक्ष ॲड.श्री कैलास शेवाळे,उपाध्यक्ष ॲड.बाळासाहेब रगडे,सचिव ॲड. हरिश्चंद्र राऊत यांनी कोर्टाची परवानगी मिळवून दिली. दुय्यम न्यायालयाचे न्यायाधीश श्री. राऊत व न्यायाधीश श्री.थापेकर यांनी विद्यार्थ्यांना दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये कामकाज चालू असताना विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी दिली व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात न्यायालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते ते पाहता आले दोन्हीही कोर्टाचं कामकाज विद्यार्थ्यांनी अनुभवलं त्यानंतर विद्यार्थ्यांना एकत्र बसून न्यायाधीश श्री राऊत व श्री थापेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच श्री ॲड.कैलास शेवाळे, श्री ॲड. बाळासाहेब टकले, ॲड.रंधवे मॅडम, ॲड.टकले मॅडम ,ॲड.रेणुकर मॅडम, ॲड.वृषाली शेवाळे मॅडम, ॲड.साधना सुपेकर मॅडम या सर्वांनी विद्यार्थ्यांना विविध कलमांची व न्यायव्यवस्थेची माहिती दिली व मार्गदर्शन केले. या सर्वांचे आभार प्रा.मुस्ताक शेख सर यांनी मानले.



