राशीन येथे काशीविश्वेश्वर रथयात्रेनिमित्त राजेभोसले परिवाराच्यावतीने भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान.

(राशीन प्रतिनिधी जावेद काझी) : – पिढानो पिढ्या धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्याचा वसा असणारे राशीन येथील राजेभोसले परिवाराच्यावतीने सालाबाद प्रमाणे काशीविश्वेश्वर रथयात्रेनिमित्त कै. शिवाजी राजे भोसले यांच्या स्मरणार्थ राजे ग्रुप आयोजित भव्य कुस्त्याचे निकाली मैदान गुरुवार दिनांक.१४/८/२०२५. रोजी दुपारी ४ वा. ठिकाण: कै. शिवाजी राजे राजेभोसले क्रीडा नगरी भिगवण रोड पाण्याच्या टाकीजवळ राशीन येथे आयोजित करण्यात येणार असून या आखाड्यामध्ये डोळ्याचे पारणे फेडणारे महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या चर्चेत अग्रेसर असणारे काटे की टक्कर असे चुरशीची लढत करणारे पै. प्रशांत जगताप (उपमहाराष्ट्र केसरी)x पै. रोहित जवळकर (महाराष्ट्र चॅम्पियन पुणे) पै .सतपाल सोनटक्के(महाराष्ट्र चॅम्पियन अकलूज)x पै. श्रीमत भोसले (महाराष्ट्र चॅम्पियन)x पै. योगेश पवार (उपमहाराष्ट्र केसरी) व इतर अनेक नामांकित पैलवानांच्या ( मल्यांच्या )प्रेक्षणीय काटा कुस्त्या होणार असून राजे ग्रुप तर्फे एक नंबर कुस्तीसाठी चांदीची गदा ठेवण्यात आली असून इतर कुस्त्याना देखील मोठ्या रकमेची बक्षीसे दिले जाणार आहेत.

हे नामांकित कुस्ती आखाडा पाहण्यासाठी मा. ना. प्राध्यापक राम शिंदे साहेब(सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य).मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील (पालकमंत्री अहिल्यानगर) मा.आमदार रोहित पवार (कर्जत -जामखेड)मा. अंबादास पिसाळ (जिल्हा बँक संचालक). काकासाहेब तापकीर, राजेंद्र फाळके व इतर कुस्तीप्रेमी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कुस्ती आखाडा संपन्न होणार असून कर्जत तालुक्यासहित राशीन पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती लोकनेते संभाजी राजे राजेभोसले परिवार व आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.





