राशीन येथे काशीविश्वेश्वर रथयात्रा हर हर महादेव च्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी:-राशीन येथे काशीविश्वेश्वर रथयात्रा आनंदमय वातावरणात जल्लोषात साजरी करण्यात आली. हर हर महादेव गजरात राशीन नगरी दुमदुमली सर्वप्रथम काशी विश्वेश्वर भगवान, नमो वीरभद्र, गणपती, विष्णू, या मूर्तींची व रथाचीविधिवत पूजा सत्पुरुष आखोबास्वामी यांचे वंशज श्री योगेश ईश्वर शेटे यांनी सपत्नीत केली. यावेळी संपूर्ण शेटे परिवार, राशीनो पंचक्रोशीतील मान्यवर मानकरी, सेवेकरी, वारकरी संप्रदाय, भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रेस दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास टाळ गजराच्या, ढोल ताशा च्याआवाजात फटाक्यांची आतिषबाजी करीत सुरुवात झाली.

याप्रसंगी राशीन सह इतर परिसरातून आलेल्या भाविक भक्त, महिला वर्ग बच्चे कंपनी यांची काशी विश्वेश्वर रथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळाली. तसेच रथयात्रेनिमित्त बच्चे कंपनी,महिला, तरुणी, तरुणांच्या, मनोरंजनासाठी मौत का कुवा, पाळणे, सापसिडी, भिंगरी, व इतर वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी,व मिठाई दुकाने मोठ्या प्रमाणात यात्रेनिमित्त आलेले पाहावयास मिळाले. रथयात्रेदरम्यान कर्जतचे पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब व त्यांच्या टीमच्या वतीने चोख बंदोबस्त पहावयास मिळाला.




