pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

कर्जत ; व्यापारी बांधवांना दिलासा – गाळे वाटपात सकारात्मक विचार करणार : नगराध्यक्षा रोहिणी घुले

Samrudhakarjat
4 6 0 8 4 9

(समृध्द कर्जत प्रतिनिधी)  – कर्जत नगरपंचायतीच्या जुन्या नगरपंचायत रोडवरील व्यापारी बांधवांचा सकारात्मक विचार करून नवीन व्यापारी संकुलातील गाळे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी व्यापारी संघटनेच्या बैठकीत दिली.

जुन्या नगरपंचायत जागेवर नगरपंचायतीद्वारे सुमारे 100 व्यापारी गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या गाळ्यांच्या वाटपात आमच्या भागातील स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी व्यापारी बांधवांनी नगरपंचायतीच्या सभागृहात भेट देऊन चर्चा केली.

या बैठकीत बांधकाम समितीचे सभापती भास्कर भैलुमे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांच्यासह व्यापारी संघटनेचे संतोष थोरात, ज्ञानेश्वर शेळके, सुरेश गोंजारे, विनायक साळुंके, शाकीर शेख, केरा म्हेत्रे, कांतीलाल तोरडमल, जगन्नाथ शिंदे, राहुल भैलुमे, मल्हारी राऊत, सचिन तोरडमल, राजेश ससाने, छबुराव बनकर, ईश्वर वाळके, प्रवीण गाडेकर, हनुमंत भोगे, उमेश तापकीर, सोमनाथ पठाडे, विनोद काकडे, सचिन थोरात, संजय सुर्वे, ज्ञानेश्वर नलवडे, तानाजी पाटील, संजय निंबाळकर, श्रीकृष्ण कामठे यांच्यासह अनेक गाळेधारक उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी जोरदारपणे मांडलेल्या मागण्यांना प्रतिसाद देताना नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या आणि गाळे वाटप करताना स्थानिक व्यापाऱ्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असा शब्द दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker