कर्जत मध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; अनेक जखमी, वाहनांची तोडफोड

कर्जत, दि. 9 फेब्रुवारी 2025: कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन मोठा गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कर्जत पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून, मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली आहे.
प्रकरण 1: सौ. कोमल किशोर शिरसागर यांची फिर्याद
गुन्हा क्रमांक: 83/2025
कलम: भादंवि 119(1), 118(1), 115(2), 189(2), 352, 351(2)(3), 324(4)(5)
फिर्यादी: सौ. कोमल किशोर शिरसागर (वय 27, रा. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर)
आरोपी:
घटनाक्रम:
दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता फिर्यादी कोमल शिरसागर या त्यांच्या वडिलांच्या घरासमोर उभ्या असताना वरील 21 आरोपींनी एकत्र येऊन हल्ला केला. लोखंडी गज, कुराड, उसाचा कोयता, दगड आणि काठ्यांचा वापर करून फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना व नातेवाईकांना बेदम मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताला मार लागला असून, त्यांच्या वडिलांच्या ओठाला, चुलती नंदाबाई राऊत यांच्या पायाला, किरण नलवडे यांच्या डोक्याला दोन टाके पडले, तर विकास तोरडमल यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या काचा फोडल्या, मोटरसायकली आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा (कर्जत पोलीस स्टेशन)
प्रकरण 2: छबाबाई विठ्ठल गदादे यांची फिर्याद
गुन्हा क्रमांक: 82/2025
कलम: भादंवि 118(1)(2), 119(1), 115(2), 189(2), 191(2)(3), 190, 352, 351(2)(3) सह आर्म्स अॅक्ट 3/25
फिर्यादी: छबाबाई विठ्ठल गदादे (वय 55, रा. भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
आरोपी:
घटनाक्रम:
दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता फिर्यादी छबाबाई गदादे यांच्या घरा समोर आरोपींनी ट्रॅक्टर आणून गुरांचे शेड पाडण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला असता वाद विकोपाला गेला. आरोपींनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत लोखंडी गज, पीव्हीसी पाईप, कोयता, लाकडी काठ्या आणि पिस्तुलासारखी हत्यारे वापरून हल्ला केला.
या हल्ल्यात विठ्ठल गदादे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, फिर्यादी छबाबाई गदादे यांच्या पायाला, शुभम गदादे यांच्या हाताला, तर मारुती गदादे यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दोन डोरले व मणी असलेले गंठन जबरदस्तीने हिसकावून नेले.
तपास अधिकारी: सपोनि वसावे (कर्जत पोलीस स्टेशन)
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस अधिकारी रमीझ मुलाणी, प्रदीप बोऱ्हाडे, सज्जन नारेडा, वसावे, संभाजी वाबळे, साळवे हे तपास करत आहेत.
या घटनेमुळे भांडेवाडी परिसरात तणावाचे वातावरण असून, पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.