न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा

कर्जत प्रतिनिधी : – शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री .शिवाजी पाटील आणि प्रमुख पाहुणे श्री.शेंडगे खंडेराव (माजी मुख्याध्यापक तथा विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था (उत्तर विभाग) हे होते. तत्पूर्वी संगीत शिक्षक पांडुरंग डाडर यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या हस्ते वरील मान्यवरांचा शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शेंडगे सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे सांगीतले. तसेच दैनंदिन जिवनात व्यायाम आणि आहार यांचे महत्व सांगितले व त्यांनी प्रामाणिकपणा हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवले. सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या आणि बहुमोल मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त, संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले.
याप्रसंगी शाळेचे समन्वयक किरणजी नाईक ,मुख्याध्यापक श्री .शिवाजी पाटील ,पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख अफ्रिन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थींनी वैष्णवी शेटे व कार्तिकी दहिफळे यांनी केले . आभार प्रदर्शन इयत्ता नववीचा विद्यार्थी साहिब शेख याने केले.