pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

सभापती राम शिंदे व एकल महिला संघटनेच्या महिला भगिनींच्या हस्ते विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या गणरायाची आरती

Samrudhakarjat
4 6 0 8 4 9

कर्जत (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांच्या प्रभाग क्र. ८ मधील विघ्नहर्ता मित्र मंडळ येथे सभापती राम शिंदे व एकल महिला संघटनेच्या महिला भगिनींच्या हस्ते आरती करून गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी विघ्नहर्ता मंडळाचे  तेजस माने,सुधीर तांदळे, संकेत कांबळे, रोहन सुरवसे, शिवराज कदम, अथर्व ढेरे, गौरव जगताप, शौर्य शिंदे सर्व पदाधिकाऱ्यांनी  सभापती राम शिंदे यांचा सत्कार केला.

या प्रसंगी नगराध्यक्ष रोहिणी घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले,  उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे,भाजप नेते सचिन घुले,मंडळ अध्यक्ष अनिल गदादे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमें, प्रसाद ढोकरीकर, सुनील शेलार, लालासाहेब शेळके, रवींद्र सुपेकर, देविदास खरात, विनोद दळवी, आदित्य शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपचे शहर व तालुक्यातील पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सुंदर सजावट, भक्तिभावाने सजवलेल्या मुर्त्या  आणि भाविकांचा उत्साह पाहून वातावरण दुमदुमले. यावेळी सभापती शिंदे यांनी श्री गणरायाच्या चरणी सर्व कर्जतकरांच्या सुख-समृद्धी व आरोग्याची प्रार्थना केली.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेटी दिलेले  मंडळे : 🔸 गवंडे गल्ली फ्रेंड्स सर्कल 🔸 गोडड महाराज फ्रेंड्स सर्कल 🔸 मुंजोबा युवक मंडळ 🔸 माननीय गणपती गुरुवार क्लब युवक मंडळ 🔸 नवयुग युवक समूह 🔸 बुवासाहेब नगर फ्रेंड्स सर्कल 🔸 सिद्धिविनायक युवक फ्रेंड्स सर्कल
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker