लोकनेते संभाजी राजे भोसले त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राशीन येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- लोकनेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पोलीस पाटील, असे अनेक पदे भूषवलेले आपले सर्वांचे लाडके लोकनेते संभाजी राजे राजे भोसले उर्फ (अण्णा) यांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त राशीन व परिसरात वार्ड क्रमांक २ मधील यशोदानंद गोशाळेतील जनावरांना चारा वाटप व वृक्ष लागवड करण्यात आली . तसेच राजे वस्ती, माऊली सायकर वस्ती ग़ौळरान, सायकर वस्ती, मोडळे वस्ती , या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेच्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. असे विविध सामाजिक उपक्रम अण्णांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त
राबवण्यात आले. यावेळी मा. उपसरपंच शाहू राजे भोसले, ऍड. ग्रामपंचायत सदस्य युवराज सिंह राजे भोसले, माजी सरपंच बबन घोसे, भाजपा भटक्या विमुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सचिव सोयब काझी, दादासाहेब परदेशी, पत्रकार मिलिंद राऊत, अमोल कुलथे, पोपट सायकर, इम्रान शेख, शुभम बोरा,पोपट गुटाळ , रोहिदास मोढळे,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.