ब्रेकिंग
कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. किरण जगताप ; उपाध्यक्ष पदी दादासाहेब शिंदे

Samrudhakarjat
4
0
1
8
7
9
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. किरण जगताप यांची उपाध्यक्षपदी दादासाहेब शिंदे तर सचिवपदी प्रा. सोमनाथ गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मिरजगाव येथे संस्थापक महादेव सायकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
बैठकीत निवडलेली कार्यकारिणी अशी : कार्याध्यक्ष- विनायक चव्हाण, सहसचिव – अस्लम पठाण, जिल्हा प्रतिनिधी – महादेव सायकर, भाऊसाहेब तोरडमल, खजिनदार- प्रा. किशोर कांबळे, सदस्य : संतोष रणदिवे, योगेश गांगर्डे, मिलिंद राऊत. कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. राहुल जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रेस क्लबचे काम नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. किरण जगताप यांनी निवडीनंतर म्हटले आहे.